रावेरात तीन वर्षीय मुलीचा खून, सावत्र बापासह सख्या आईला अटक

रावेरात तीन वर्षीय मुलीचा खून, सावत्र बापासह सख्या आईला अटक

Jun 1, 2024 - 23:32
Jun 2, 2024 - 00:01
 0
रावेरात तीन वर्षीय मुलीचा खून, सावत्र बापासह सख्या आईला अटक

रावेर प्रतिनिधी |

  सावत्र बापाने तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रावेर शहरात घडल्याने रावेर शहरात खळबळ उडाली आहे. चिमूरड्या मुलीच्या खून प्रकरणी मुलीची सख्खी आई व सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली असून खूनामागील कारण समजू शकले नसून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. कुणाचे कारण अद्या स्पष्ट झाल्याचे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली तर माधुरी घेटे व अजय घेटे अशी अटक केलेल्या मुलीच्या आई वडिलांचे नाव आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलासवाडी येथील रहिवासी माधुरीचा वारोली तालुका मुक्ताईनगर येथील रहिवाशी भारत मसाने याच्याशी 2017 मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा असे दोन अपत्य होते. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलासवाडी येथे माहेरी आईकडे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते . तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. 

31 मे शनिवार रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली होती.ही घटना अजयची पत्नी माधुरीस माहिती असूनही तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह पती पत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मात्र यावेळी माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खा बाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितले. म्हसाने याला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे तपासणी केली असता मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलीचे शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने रावेर पोलिसांनी मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान खूनाचे कारण समजू शकले नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ तपास करीत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील