मालकाच्या त्रासाला कंटाळून तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या, भारती ज्वेलर्सच्या तीनही मालकाविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल
मालकाच्या त्रासाला कंटाळून तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या, भारती ज्वेलर्सच्या तीनही मालकाविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क
रावेर शहरातील भारती ज्वेलर्स दुकान मालकाच्या त्रासाला कंटाळुन काम सोडल्याच्या कारणा वरुन एका युवकाने आत्महत्या केल्या प्रकरणी भारती ज्वेलर्सच्या तिनही मालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रावेर शहरातील कासार गल्लीतील रहीवासी (मयत) किशोर सैतवाल वय ४० हा शहरातील भारती ज्वेलर्स मध्ये काम करत होता.त्याने या ज्वेलर्स मधुन काम सोडले होते.
या कारणा वरुन भारती ज्वेलर्सचे मालक १) करण गणवानी २) अनुराग गणवानी ३)महेश गनवाणी हे दि २२ मार्च २०२३ ते दि २७/१०/२०२३ या दरम्यान किशोर यास वेळो-वेळी मोबाईल वर तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन मयताचा भाऊ आई यांच्या मोबाईलवर तसेच काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आमच्याकडे कामाला परत ये नाही तर तुझ्यावर चोरीचा आरोप ठेऊन समाजात बदनाम करू व तुला कूठेही काम मिळवु देणार नाही व किशोर याच्या घरा जवळ येऊन मारहान केली.त्यामुळे भारती ज्वेलर्सच्या तिघा मालकां कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळुन किशोर याने घराच्या छतास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयताची आई रत्नाबाई बाबूराव सैतवाल यांनी देलेल्या फिर्यादी वरुन भारती ज्वेलर्सच्या तिघे मालका विरुध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले पो कॉ संभाजी बिजाग़रे करीत आहे.