किनगाव येथे झालेल्या अपघातातील तरुण कुशल इंगळे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर:-किनगाव येथे झालेल्या अपघातातील तरुण कुशल इंगळे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Mar 12, 2026 - 10:11
 0
किनगाव येथे झालेल्या अपघातातील तरुण कुशल इंगळे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी  मृत्यू

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर |

खिरोदा : येथील धनाजी नाना विद्यालयासमोरील कलानगर परिसरातील रहिवासी कुशल सुरेश इंगळे (वय १९) यांचे बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता उपचारादरम्यान निधन झाले.

 दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी किनगावजवळ झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी 5 वाजता खिरोदा येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक सुरेश गंगाधर इंगळे यांचे सुपुत्र तर वैभव सुरेश इंगळे यांचे भाऊ होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे

ईश्वर यांच्या परिवाराला  या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच मुक्ताई वार्ता परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील