धामोडी जवळ बस व मोटरसायकलच्या अपघात 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

धामोडी जवळ बस व मोटरसायकलच्या अपघात 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sep 21, 2023 - 16:27
 0
धामोडी जवळ बस व मोटरसायकलच्या अपघात 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

रावेर तालुक्यातील आजंदा येथील रहिवासी बबन भाऊलाल पाटील वय 35 श्री समर्थ कृषी केंद्र संचालक हे धामोडी हून कांडवेल कडे जात असताना, काडवेल कडून रावेर कडे येत असलेल्या बस आणि मोटरसायकलच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. 

घटनेची माहिती मिळताच रावेर तालुक्यातील सर्व कृषी केंद्र संचालक व नातेवाईकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली शवविच्छेदन साठी रावेर ग्रामीण रुग्णालयात येथे आणले असता नातेवाईकांनी दवाखान्यात आक्रोश केला. सर्वच लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे

निंभोरा पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील