निवडणूक कामाकरिता जाणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या वाहनाला अपघात
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l निवडणूक कामाकरिता जाणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याने त्यांना चोपडा येथील रुग्णालयात उत्तरासाठी दाखल करण्यात आले
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनाला किनगाव बु. जवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान अपघातातील जखमींना चोपडा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रावेर विधानसभा मतदार संघात मतदारसंघातील निवडणूक कामी नियुक्त असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले, कविता बाविस्कर, लतीफा परवीन चांद खान हे कर्मचारी तर विनोद पाटील हे खाजगी वाहन गाडी क्रमांक MH 03 BJ 8253 रावेर कडे जात असताना किनगाव जवळ अपघात झाला. त्यानंतर त्यांना चोपडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
या जखमी कर्मचाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात चोपडा येथील डॉ. नीलिमा देशमुख डॉ. प्रसाद पाटील डॉ. पवन पाटील व डॉ. सुरेश पाटील यांनी उपचार केले.