केऱ्हाळ्यात पत्री शेड ठोकतांना खाली पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर केऱ्हाळ्यात पत्री शेड ठोकतांना खाली पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर -
तालुक्यातील केऱ्हाळे येथे पत्री शेड बसवण्याचे काम सुरू असताना उंचावरून खाली पडून विठ्ठल मंदिर परिसरात राहणारा विजय दत्तात्रय पाटील वय 41 या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
शेड ठोकत असताना तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत्युची माहिती मिळताच कुटुंबिय व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदना साठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,अंबिका व्यायाम शाळा अध्यक्ष भास्कर महाजन,विनोद पाटील, चंदू पाटील, प्रमोद पाटील, बाळू पाटील यांनी नातेवाईकांचे सांत्वन केले
संध्याकाळी उशिरा केऱ्हाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील करीत आहे.