Raver Bribe | रावेर तालुक्यातील उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक १० हजारांची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात तर पंटर ही ताब्यात
मुक्ताई न्युज नेटवर्क रावेर ।कारवाई करणार नाही त्या बदल्यात दहा हजारांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दुय्यम निरिक्षकाला खासगी पंटरसह जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मुक्ताई न्युज नेटवर्क रावेर ।
कारवाई करणार नाही त्या बदल्यात दहा हजारांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दुय्यम निरिक्षकाला खासगी पंटरसह जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दारूबंदी कायद्यान्वये कारवाई टाळण्यासाठी आणि दारूचा धंदा सुरळीत चालू ठेवू देण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह त्याच्या खासगी चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल आणि उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांच्या वडिलांवर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ प्रमाणे कारवाई न करण्यासाठी, तसेच तक्रारदाराचा दारूचा धंदा यापुढेही विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विजय भास्कर पाटील याने पैशांची मागणी केली होती.
पाटील याने प्रति महिना १,५०० रुपये याप्रमाणे १२ महिन्यांचे एकूण १८,००० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती यातील १०,००० रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले. तक्रारदाराने याप्रकरणी १७ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव एसीबीकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी सिद्ध झाली.
त्यानुसार आज १८ डिसेंबर रोजी रावेर परिसरात सापळा रचण्यात आला. विजय पाटील याच्या सांगण्यावरून त्याचा खाजगी चालक भास्कर रमेश चंदनकर राहणार खानापूर तालुका रावेर याने १०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने विजय भास्कर पाटील (वय ५१): दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन रावेर. (मूळ रा. उहा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) . या दोघांना ताब्यात घेऊन कारवाई केली
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने केली. विजय पाटील हे राज्य उत्पादन शुल्कच्या रावेर तालुक्यातील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत होते. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.