सावदा पिपंरुड रस्त्यावर भीषण अपघात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटन, रावेर परिसरात पसरली शोककळा
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l सावदा पिपंरुड रस्त्यावर भीषण अपघात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटन, रावेर परिसरात पसरली शोककळा
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
सावदा – भुसावळ रस्त्यावरील सावदा – पिंपरुड रस्त्यावर होंडा सिटी कारने झाडाला ठोस दिल्याने मोठा अपघात झाला, या भीषण अपघातात तीन ते चार जण जागीच ठार झाल्याचे समजते. तर काही गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास भुसावळ कडून येणाऱ्या MH 20 CH 8002 या क्रमांकाच्या होंडा सिटी गाडीने सावदा – भुसावळ रस्त्यावरील पिंपरुड सावदा दरम्यानच्या रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने त्यात कारचा चक्काचूर झाला, कार गाडीचे मशीन चे पार्ट -पार्ट जवळ जवळ १०० ते १५० फूट अंतरावर विखुरले गेले.
या कार मध्ये ६ जण असल्याची माहिती मिळत असून त्यातील शुभम सोनार, मुकेश रायपुरकर,जयेश भोई हे तीन जण ठार झाले असून विजय जाधव, गणेश भोई,अक्षय उन्हाळे यांना जळगाव सिविल हॉस्पिटल ला नेण्यात आले आहे असे समजते. कार ने ज्या झाडाला धडक दिली त्या झाडाची संपूर्ण साल निघून गेली आहे. ही कार रावेर येथील दशरथ सोनार यांची असल्याची माहिती मिळत आहे.