रावेर पोलिसात चार सी एस सी सेंटरवर केळी पिक विमा घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-रावेर तालुक्यातील चार सीएससी सेंटरवर केळी पिक विमा घोटाळा प्रकरणी रावेर पोलिसात तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Mar 18, 2026 - 21:04
 0
रावेर पोलिसात चार सी एस सी सेंटरवर केळी पिक विमा घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-

शासनातर्फे रावेर तालुक्यात 2025-26 या वर्षात राबविलेल्या अंबिया बाहर केळी पिक विमा योजनेत सुमारे 4 कोटी 74 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चार सीएस सी सेंटर चालकांविरुद्ध रावेर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर निंभोरा परिसरातील दोन सीएससी सेंटर चालक अजून पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

मागील वर्षी रावेर तालुक्यात विमा कंपनीतर्फे केळीसाठी अंबिया बाहर विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांतर्फे सहभाग नोंदवला जातो. पिक विम्याचा अर्ज सीएससी सेंटर मार्फत पिक विमा कंपनीकडे सादर केला जातो. मात्र एमआरसाक प्रणालीने केलेल्या पडताळणीत रावेर तालुक्यातील 962 हेक्टरवर केळी पिक आढळून आलेले नाही.

त्यामुळे या क्षेत्रावरील पिक विमा जास्तीचा आढळून आला आहे. रावेर तालुक्यातील जयेश कोळी रावेर, विजय पाटील तमासवाडी, प्रफुल्ल सराफ रावेर व हर्षल पाटील अटवाडा या सीएससी सेंटर चालकांनी शासनाचा विश्वासघात करून फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आज रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिक विमा घोटाळ्यातील अनेक चेहरे पोलीस चौकशीतून समोर येणार आहे. पिक विम्याच्या घोटाळ्या गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 केळीची लागवड शेती क्षेत्रावर नसताना खोटे सातबारा उतारे जोडून सीएससी सेंटर चालकांनी पिक विमा काढल्याचे शासकीय तपासणी व पडताळणीत उघड झाले आहे. या प्रकरणात अनेकांचे हात असून पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली असून चौकशीतून शासनाचे फसवणूक करणाऱ्या अनेकांचा चेहरा समोर येणार आहे. यामुळेच आता सर्वांचे धाबे दणाणलेले आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील