रावेर येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
25 ऑगस्ट जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा रावेर येथे सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या माध्यमातून कमलाबाई गर्ल्स हायस्कूल जिमखाना हॉल रावेर येथे घेण्यात आल्या.
रावेर मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
25 ऑगस्ट जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा रावेर येथे सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या माध्यमातून कमलाबाई गर्ल्स हायस्कूल जिमखाना हॉल रावेर येथे घेण्यात आल्या.
स्पर्धेला उपस्थित मान्यवर गटशिक्षण अधिकारी शैलेंद्र दखणे साहेब कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जे एस कुलकर्णी मॅडम सरदारजी स्कूलचे माजी मुख्याध्यापक टी बी महाजन सर उप मुख्याध्यापक ई जे महाजन सर, महाराष्ट्र विद्या मंदिर वाघोड शाळेचे मुख्याध्यापक ए पी पाटील सर प्रकाश विद्यालय वाघोदा येथील क्रीडा शिक्षक बी टी सपकाळे सर चिनावल हायस्कूलचे नितीन महाजन सर कमलाबाई गर्ल्स हायस्कूल चे पर्यवेक्षक आर एल तायडे सर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते खेळाचे दैवत बजरंगबली यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच हॉकी खेळाची जादूगार मेजर ध्यानचंद व कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन केले
स्पर्धेची सुरुवात बुद्धीवरची स्पर्धा मान्यवरांमध्ये खेळवून सुरुवात करण्यात आली.
संपूर्ण स्पर्धा सरदार जी जी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक टी बी महाजन सर, प्रकाश विद्यालय वाघोदा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक बी टी सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या तर स्पर्धेचे संपूर्ण काम जे के पाटील सर, क्रीडा समन्वयात युवराज माळी सर, अजय महाजन सर किरण महाजन सर ,मोहन महाजन यांनी पाहिले
त्याप्रसंगी तालुक्यातील क्रीडा शिक्षक म्हणून प्रशांत सोनवणे अनिल पाटील जयेश बिरपण सर, श्रीकांत महाजन सर,
दीपक जाधव सर, अमर रणसिंगे सर शुभांगी महाजन मॅडम, कल्पना सपकाळे मॅडम सुवर्णा पाटील मॅडम, मंगेश महाजन सर सय्यद शहा नावाज अली सर, राहुल जाधव सर उपस्थित होते
स्पर्धेत १४,१७ व १९ वर्ष वयोगटा मधील मुले व मुली खेळाडू सहभागी होते.
यात तालुक्यातून सहभागी झालेल्या शाळेतील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली यशस्वी खेळाडूंची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय महाजन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन युवराज माळी सर यांनी केले.