अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर कारवाई रावेर : तिनही वाहनांना प्रत्येकी दीड लाखांचा दंड

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर कारवाई रावेर : तिनही वाहनांना प्रत्येकी दीड लाखांचा दंड

Aug 25, 2023 - 16:04
Aug 26, 2023 - 00:01
 0
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर कारवाई रावेर : तिनही वाहनांना प्रत्येकी दीड लाखांचा दंड

मुक्ताई न्यूज 

तालुक्यातील सुकी नदीपात्रातून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर महसूल पथकाने कारवाई केली आहे. त्यात दोन मालवाहू वाहने आणि एका ट्रॅक्टरचा समावेश आहे. त्यांच्या मालकांना दीड लाखाचा दंड ठोठावण्यात आला.

तहसीलदार बंडू कापसे व निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या मंडळाधिकारी जे. डी. बंगाळे (खिरोदा), दीपक गवई (ऐनपूर ), यासीन तडवी (रावेर), विठोबा पाटील (ख़ानापूर) विजय धांडे, प्रवीण वानखेडे (सावदा), तलाठी गोपाळ भगत (खानापूर) यांच्या भरारी पथकाने पाल घाटातून खिरोद्याकडे जाणाऱ्या विनय नरसिंग पवार रा. पाल, ता. रावेर यांचे वाहन (एम एच १० / एक्यु ५५००) आणि प्रदीप

अर्जुन जाधव (रा. पाल, ता रावेर) (एम एच २० / सी. यू०२७९) या दोन अवजड वाहनांना, तसेच त्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंडई करण्यात आला. 

त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील