सामाजिक बांधिलकी जोपासत अपघात ग्रस्त रुग्णावर माऊली फाउंडेशनचे डॉ .संदीप पाटील व डॉ. योगिता पाटील यांनी केले रस्त्यावरच उपचार
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- सामाजिक बांधिलकी जोपासत अपघात ग्रस्त रुग्णावर माऊली फाउंडेशनचे डॉ .संदीप पाटील व डॉ. योगिता पाटील यांनी केले रस्त्यावरच उपचार केल्याने तरुणाचा जीव वाचला यामुळे सर्वच डॉक्टर दांपत्याचे अभिनंदन होत आहे

मुक्ताई नेटवर्क रावेर l
यावल तालुक्यातील पाडळसे भुसावळच्या दरम्यान रस्त्यावर एक अनोळखी तरुण व्यक्तीचा अपघात झाला. रस्त्यावर अपघात होऊन जखमी झालेल्या तरुणावर उपचार करण्यासाठी रावेर तालुक्यातील प्रसिद्ध स्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ डॉ संदीप पाटील व बालरोग तज्ञ डॉ.सौ योगिता पाटील सामाजिक सलोखा जोपासतात तात्काळ उपचार केले.
आपल्या देशांमध्ये अनेक डॉक्टरांना कामाच्या निमित्ताने रोड प्रवास करावा लागतो. अशा प्रत्येक डॉक्टरांनी आपल्याजवळ रस्त्यावर एक्सीडेंट झाल्यावर लागणारे औषध उपचाराचे साहित्य बरोबर ठेवल्यास व जखमी व्यक्तीवर तात्काळ अत्यावश्यक प्राथमिक उपचार केल्यास रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्या असंख्य लोकांचे प्राण वाचू शकतात. अशी संकल्पना ज्यांनी सर्वप्रथम मांडली तेच हे डॉ.दांपत्य आहेत.
खरंच यालाच म्हणतात "ईश्वरातला देव माणूस" असा सगळ्यांनीच विचार केला तर रस्ते अपघातात कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही
आपण आपला व्यवसाय करताना त्यातला काही भाग हा सामाजिक बांधिलकी म्हणून जर वापरला तर अशा प्रकारे तो समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. डॉ.संदीप पाटील व डॉ योगिता पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याला मुक्ताई परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन