सावदा फैजपूर भुसावलं रोडवरील वाहतूक सकाळी 8 ते रात्री 7 वाजे पर्यंत बंद ,शिवपुराण कथेनिमित्त वाहतुकीत बदल

सावदा फैजपूर भुसावल रोडवरील जाणा येणारी वाहतूक मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर -:शिवपुराण कथेनिमित्त बदल करण्यात आले आहे तरी नागरिकांनी पर्यायी रस्त्याने येजा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

Mar 9, 2026 - 11:38
 0
सावदा फैजपूर भुसावलं रोडवरील वाहतूक सकाळी 8 ते रात्री 7 वाजे पर्यंत बंद ,शिवपुराण कथेनिमित्त वाहतुकीत बदल

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- अकलुद शिवार परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेदरम्यान वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेता जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.

मंगळवार दि. १० मार्च २०२६ ते सोमवार दि. १६ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळाजवळील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (बी) अंतर्गत जारी केला आहे.कार्यक्रम भुसावळ-फैजपूर रोडवरील गुरुकृपा पेट्रोल पंपाच्या मागे, अकलुद शिवार येथे होत असून, त्या परिसरातील सर्व रस्ते व उपरस्त्यांवर वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

भुसावळ-फैजपूर रोडवरील हॉटेल रिव्हर पॉईंट ते भोरटेक फाटा दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील.

भुसावळकडून फैजपूरकडे जाणारी वाहने (एसटी बस, कार, रिक्षा, दुचाकी) अकलुद जुना टोल नाका - यावल मार्गे वळविण्यात येतील. तसेच फैजपूरकडून भुसावळकडे जाणारी वाहने यावल टी-पॉईंट मार्गे तापी पुलावरून भुसावळकडे वळवली जातील.

रावेर-सावदा-फैजपूर मार्गे भुसावळकडे जाणारी वाहने बनाना सिटी सावदा येथून हतनूर-बोहर्डी फाटा मार्गे वळविण्यात येतील.

रावेर-सावदा-फैजपूर मार्गे येणारी अवजड वाहतूक (मालट्रक) यावल-किनगाव मार्गे जळगाव-भुसावळकडे वळविण्यात येईल.

चोपडा-यावलहून भुसावळकडे जाणारी वाहने धानोरा फाटा (अडावद) येथून डांभुर्णी-जळगाव मार्गे वळवली जातील.

याव्यतिरिक्त वेळोवेळी झालेल्या बदल कळवण्यात येतील असे माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील