मोठी बातमी-:बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतर्गत मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची माहिती...*
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर -: बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतर्गत मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची माहिती.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
*बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग* प्रकल्पांतर्गत *रावेर, यावल, फैजपूर* आणि *सावदा* शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली असून, या विकासकामांच्या नियोजनाबाबत आज *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)* च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि आवश्यकतांचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
*प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी* यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली तसेच *केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी जी* यांच्या मार्गदर्शनाखाली *बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाची* उभारणी वेगाने सुरू आहे. वाढती वाहतूक आणि शहरांमधील जागेची मर्यादा लक्षात घेऊन *रावेर, यावल, फैजपूर व सावदा* या शहरांना वळसा घालणाऱ्या बायपास मार्गाची रचना करण्यात आली आहे.
या बायपासमुळे शहरांतून जाणाऱ्या विद्यमान रस्त्यांच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना दैनंदिन वाहतूक, व्यावसायिक व्यवहार आणि दळणवळणाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत शहरांतर्गत समांतर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे.
या विकासकामांमुळे *रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा* शहरांतील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरांचा सर्वांगीण विकास, दळणवळणाची सुधारणा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी सांगितले.