रावेर शहरात अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ

रावेर- मुक्ताई न्यूज नेटवर्क न्यूज । रावेर शहरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मयत अज्ञात अनोळखी व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास रावेर पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन रावेर पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

Oct 17, 2024 - 21:20
Oct 17, 2024 - 21:23
 0
रावेर शहरात अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ

रावेर- मुक्ताई न्यूज नेटवर्क न्यूज । रावेर शहरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मयत अज्ञात अनोळखी व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास रावेर पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन रावेर पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

 गुरूवार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उटखेडा रोडवरील बंद स्थितीत असलेल्या क्रीडा संकुल आवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. या व्यक्तीचे वर्णनमध्ये उंची: अंदाजे 5 फूट 1 इंच, रंग: सावळा, वय: अंदाजे २५ ते २८ वर्षे, कमरेतः काळ्या रंगाचा करदोडा अंगातः काळ्या रंगाचे फुल बायांचे टी-शर्ट तसेच नीळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, हिरव्या रंगाची निकर, उजव्या हातात: काळा पट्टा असलेले घड्याळ, डाव्या हातात स्टीलचे कळे असुन वरील वर्णाचा कोणी असल्यास किंवा घरून निघून गेला असल्यास रावेर पोलीस स्टेशन येथील दूरध्वनी क्रमांक 02584-250333 यावर संपर्क करण्याचे आवाहन रावेर पोलिसातर्फे करण्यात आले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील