भाजपाची जळगाव जिल्ह्यातील 5 विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Big Breking???? रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क | भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जिल्ह्यातील पाच विधानसभा जागांचा समावेश आहे.
रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क |
भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जिल्ह्यातील पाच विधानसभा जागांचा समावेश आहे.बऱ्याच दिवसांपासून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नेमकी कुणाकुणाला मिळणार याबाबत त्यामुळे वातावरणही तापले होते. आज भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये ९९ मतदारसंघांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, रावेर, भुसावळ अशा पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
भाजपाने उमेदवारांची यादी घोषित करण्यात आघाडी घेत जामनेरातून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, भुसावळमधून आमदार संजय सावकारे, चाळीसगावातुन आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलमधून भाजपा जळगाव पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्या नावाची घोषणा केली आहे
भारतीय जनता पक्षाने कोणतीही रिस्क न घेता विद्यमान आमदारांसह अपेक्षित नावांनाच प्राधान्य दिल्याचे या यादीतून दिसून येत आहे. निवडणुकीचे नोटिफिकेशन निघण्याआधीच भाजपचे उमेदवारांची नावे जाहीर केल्याची बाब देखील लक्षणीय मानली जात आहे. तर कोणत्याही आमदाराचे तिकिट कापण्यात आलेले नसल्याने भाजपने जळगाव जिल्ह्यात सेफ खेळी केल्याचे दिसून येत आहे. तर निवडून येण्याच्या दृष्टीनेच उमेदवार दिले असल्याचे बोलले जात आहे यामुळे पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये काटेकी टक्कर होण्याचे चिन्ह सध्या दिसत आहेत