सरपंच संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश महाजन यांची निवड
सरपंच संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश महाजन यांची निवड
रावेर (मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क)
सरपंच परिषदेच्या जळगांव जिल्हा उपाध्यक्षपदी अटवाडे (ता.रावेर) येथील माजी सरपंच तथा रावेर बाजार समितीचे सदस्य गणेश महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत विवरे येथील जागृत हनुमान मंदीर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर यावेळी राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे पाटील, राज्य कोअर कमिटी सदस्य जे डी टिमगिरे , उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत, उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष सुषमा देसले , जिल्हाध्यक्ष संरपच परिषद बाळासाहेब धुमाळ , जिल्हा सचिव श्रीकांत पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.