स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी जयंती रावेरमध्ये उत्साहात साजरी
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी जयंती रावेरमध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर:-
शिवसेना रावेर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त रावेर येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन रावेर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी सर्वप्रथम स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले. त्यानंतर रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळे व बिस्किटांचे पुडे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.या याप्रकारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उजाळा देत समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी केल्याबद्दल उपस्थित त्यांनी समाधान व्यक्त केले
याप्रसंगी प्रल्हाद लोकसभा समन्वयक,योगीराज पाटील,जिल्हा प्रमुख, उ.बा.ठा. शिवसेना,रविंद्र पवार,उपजिल्हा संघटक, शाम भामरे,विभागीय उपाध्यक्ष,अविनाश पाटील,युवासेना माजी जिल्हा प्रमुख, प्रमोद कोंडे ,रावेर तालुका अध्यक्ष,अशोक शिंदे,तालुका संघटक,राकेश घोरपडे,शहर प्रमुख, सुरेश शिंदे,शेतकरी संघटना प्रमुख,संतोष महाजन ,संघटक,संतोष महाजन, शामराव महाजन, कैलास चौधरी, सुनील सूर्यवंशी, शेख लतिफ, गोपाळ मिस्तरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.