शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांची भावनिक साद
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांची भावनिक साद
रावेर प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी केळी पिक विमा 2022 मध्ये काढला होता परंतु त्यांना अद्याप पर्यंत केळी पीक विम्याची भरपाई मिळाली नसल्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी संघर्ष तर्फे रास्ता रोको आंदोलन व उपोषणही करण्यात आले
याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील व उपसभावती योगेश पाटील यांनी आमरण उपोषणाचा बळगा उगारात सलग चार दिवस आमरण उपोषण केले होते.
यालाच काही लोकप्रतिनिधींनी राजकीय स्टंट असल्याचे सांगत शेतकऱ्यांना विमा सरसकट मिळेल, यांच्याच उपोषणामुळे केळी पिक विमा मिळण्यासाठी वेळ लागत आहे अशा वल्गना केल्या होत्या
परंतु अद्यापपर्यंत ही बऱ्याच शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आता तरी त्या लोकप्रतिनिधींनी उभे राहावे व शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पिक विमा रक्कम मिळवून द्यावी यासाठी आम्हीही त्यांच्या सोबत उभे राहू अशी भावनिक साद यावेळी या लोकप्रतिनिधींना केली आहे