पत्नीच्या विरहात पतीचे निधन, पती-पत्नीच्या निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर
पत्नीच्या विरहात पतीचे निधन, पती-पत्नीच्या निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क
रावेर- 2 डिसेंबर शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास नशिराबाद जवळ झालेल्या अपघातात रावेर येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर या अपघातात तीन जण जखमी झाले होते. जखमीमध्ये मयत महिलेच्या पतीचाही समावेश होता. आज पत्नीच्या विरहात पतीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्याजवळ कारने नाशिकहून रावेरकडे येत असलेल्या रावेर शहरातील सुनील हंसकर यांच्या कारला शनिवारी पहाटे अपघात झाला.
या अपघातात सुनील हंसकर यांच्या पत्नी सावित्री सुनील हसकर (50, रा. रावेर) यांचा मृत्यू ओढवला तर कारमधील सुनील हंसकर यांच्यासह तीन जण जखमी झाले होते. यात मयताचे पती सुनील पंडीत हंसकर यांचाही समावेश होता.
शनिवारी पत्नीवर अंत्यसंस्कार केल्यापासून सुनील हंसकर यांची पत्नीच्या विरहाने प्रकृती खालावल्याने त्यांना सकाळी शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखवण्यात आले. त्यानंतर मध्यप्रदेशातील ब-हाणपूर येथील रूग्णालयात हलवण्यात आले. त्या ठिकाणी सायंकाळी त्यांचा मृत्यू ओढवला. दोघांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.