फैजपूर येथील स्व.मधुकरराव चौधरींच्या पुतळ्यास अभिवादन करीत, स्व. चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदार संघात राबविणार ...श्रीराम पाटील
फैजपूर येथील स्व.मधुकरराव चौधरींच्या पुतळ्यास अभिवादन करीत, स्व. चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदार संघात राबविणार ...श्रीराम पाटील
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / फैजपूर
विधानसभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या फैजपूर येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी अभिवादन केले. तसेच माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब स्व जे टी. महाजन यांच्या फैजपूर येथील इंजिनिअरींग कॉलेजमधील पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आला. स्व. मधुकरराव चौधरी यांनी रावेर तालुक्यात जलसिंचनाचे प्रकल्प बांधून पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवला आहे. स्व. चौधरी यांचा आदर्श घेऊन रावेर लोकसभा मतदार संघात शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले. त्यानंतर यावल तालुक्यात मंगळवारी प्रचाराची सुरुवात करण्यात आली . मारुळ येथील नागरिकांशी यावेळी संवाद साधत चर्चा केली.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात प्रचार दौऱ्यात सुरुवात झाली. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, माजी जि. प सदस्य प्रभाकर सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, माजी जि प सदस्य प्रा.नीलिमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) पक्षाचे फैजपुर शहराध्यक्ष अनवर खाटीक, काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख , वसीम जनाब , प्रशांत पाटील, डॉ आर वाय चौधरी, व्ही आर पाटील, एन. ए. भंगाळे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.