केळी पिक विमा नाकारण्यात आलेल्या व लाभ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे

केळी पिक विमा नाकारण्यात आलेल्या व लाभ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे

Feb 27, 2024 - 00:33
 0

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये एकूण ७८००० शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित असलेल्या ५४००० शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता, त्यातील ४५००० शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, अनेक शेतकऱ्यांना टप्याटप्याने लाभ मिळणार होता राहिलेल्या ९००० शेतकऱ्यांना एकूण *रु.३०,७२,७२,५७७/* रक्कम वितरीत करण्यात आलेली असून, त्याबाबत शासनाचा जीआर निघाला आहे. तसेच पिक विम्याचा लाभ नाकारण्यात आलेल्या ११०२२ शेतकऱ्यापैकी ६६८६ शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार असल्याबाबत माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.

विमा कंपनी मार्फत ११०२२ शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ नाकारण्यात आला होता, त्याबाबत *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *लोकसभेत* प्रश्न उपस्थित करून, याबाबत *जिल्हास्तरावर कमिटी स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देणे बाबत मागणी केली होती*. त्यानुसार, पिक विम्याचा लाभ नाकारण्यात *११०२२* शेतकऱ्यापैकी ८१९० शेतकऱ्यांनी दाद मागून पुरावे सादर केल्यानंतर *६६८६ शेतकऱ्यांना पिक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी पात्र ठरवण्यात येऊन*, लवकरच लाभ मिळणार आहे. तसेच पिक विम्याचा लाभा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या मार्फत बैठक घेण्यात येऊन शेतकऱ्यांना असलेले आक्षेप विमा कंपनी कडे पाठवून त्यांचापण प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याबाबत यावेळी त्यांनी माहिती दिली.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील