फैजपूर ते भुसावळ रस्ता ३० दिवस बंद; जड व हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ताचा वापर करण्याचे आवाहन
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- फैजपूर ते भुसावळ रस्ता ३० दिवस बंद; जड व हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ताचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-
फैजपूर ते भुसावळ मार्गावरील रस्ता रुंदीकरण दुरुस्ती व सुधारणा कामामुळे १७ जून 2026 ते १६ जुलै २०२६ या कालावधीत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या कालावधीत वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी जड व हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. जड वाहनांसाठी फैजपूर-हंबर्डी-हिंगोणा-सांगवी-चिंतोडा-यावल-भुसावळ हा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर हलक्या वाहनांसाठी फैजपूर-हंबर्डी-भालोद-चिखली-अंजाळे-भुसावळ या मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचे काम सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पूर्ण व्हावे तसेच अपघातांचा धोका टाळता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस व संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.