१९ ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस जळगाव यांच्या वतीने
"विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार-जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा"

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर:- १९ ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस जळगाव यांच्या वतीने
"विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार-जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा" आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे

Jul 28, 2026 - 10:39
 0
१९ ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस जळगाव यांच्या वतीने
"विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार-जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा"

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिक, पत्रकार आणि समाज यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पत्रकारांकरिता "विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार-जनता भागीदारी छायाचित्रस्पर्धेचे" आयोजन करण्यात येत आहे.

छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून ते समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणा यांचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार समाजातील महत्त्वाच्याघटनांचे साक्षीदार असतात आणि आपल्या कॅमेऱ्याद्वारे त्याक्षणांना इतिहासात जतन करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरवकरण्याबरोबरच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख हेतू आहे.

फोटो या ७ केटेगरी मधील पाठवावेत 

1. पोलिस इन पब्लिक सर्विस फोटो

2. क्राइम फोटो

3. सोशल फोटो

4. ट्रैफिक फोटो

5. जळगाव हेरिटेज फोटो 

6. स्पोर्ट्स फोटो 

7. वुमन इम्पॉवरमेंट फोटो

1. फोटो पाठवायची अंतिम तारीख: १२ ऑगस्ट २०२६

2. फोटो कुठे पाठवायचे: व्हॉट्स ऍप क्रमांक ९७०२२००३१५.(फोटो पोलिसांकडून मोठे करून डिस्प्ले केले जातील)

3. प्रदर्शन ठिकाण : पद्मालय हॉल , पोलिस मुख्यालय जळगाव 

4. प्रदर्शन तारीख: १५ ऑगस्ट 

5. पुरस्कार: सर्व ७ केटेगरी मधे प्रत्येकी ३

6. हस्ते : मा सर्व मंत्री महोदय, जळगाव जिल्हा 

जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी पत्रकारांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग आणि सेवाभावाचेप्रभावी दर्शन घडविण्याचे आवाहन केले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील