रावेर तालुक्यातील युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, परिवारावर ओढावला दुःखाचा डोंगर

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील रोझोदा – खिरोदा या रस्त्यावर दुचाकी घसरून रोझोदा येथील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २६ ऑक्टोबर शनिवारी दुपारी घडली.

Oct 26, 2024 - 22:34
 0
रावेर तालुक्यातील युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, परिवारावर ओढावला दुःखाचा डोंगर

मुक्ताई न्युज नेटवर्क रावेर l

 रावेर तालुक्यातील खिरोदा रोझोदा या रस्त्यावर दुचाकी घसरून रोझोदा येथील २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ ऑक्टोबर शनिवारी रोजी दुपारी घडली. यामुळे परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला अपघात ग्रस्त तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. तर याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.

रावेर तालुक्यातील रोझोदा येथील देवेंद्र राजेंद्र कोळी, वय २१ वर्षे रा. रोझोदा ता. रावेर हा युवक २६ ऑक्टोबर शनिवार रोजी खिरोदा – रोझोदा या रस्त्यावर रोझोदा गावाच्या जवळ स्मशानभूमीच्या पुढे दुचाकी MH. 19 EH. 8321 ने जात असताना अचानक दुचाकी घसरली आणि तो खाली पडल्याने त्याच्या डोक्याला दगड लागुन दुखापत झाली. त्याला तातडीने तेथून सावदा व नंतर भुसावळ येथी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये तरूणाला उपचारासाठी आणण्यात आणले असता या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून देवेन्द्रला मृत घोषित केले. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . त्याच्या जानाणे त्याच्या परिवार मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे तरुणांनी वाहन चालवताना काळजी घेणे व हेल्मेट महत्त्वाचे आहे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे 

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील