धुळे - बऱ्हाणपूर बस अपघातात १० प्रवासी जखमी, ४ गंभीर
धुळे - बऱ्हाणपूर बस अपघातात १० प्रवासी जखमी, ४ गंभीर
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील विवरे बु. गावाजवळ सोमवार 11 मार्च सकाळी १० च्या सुमारास बस ट्रकचा भीषण अपघात झाला. यात १० जखमी झाले असून ४ अत्यंत गंभीर जखमी झाले आहे.
विवरे बु. गावाजवळील स्मशान भूमी जवळ रावेर आगाराची धुळे - ब-हाणपूर बस क्र. एम. ४० वाय ५१९७ हि विवरे बु. येथून रावेर कडे जात असतांना समोरून येणारा ट्रक क्र. एच. आर. ५५ एक्स २९८३ ने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जबरजस्त होती कि बसचा सुमारे १० फुट पत्रा फाडला गेला. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. या अपघातात एकूण सुमारे २० ते २५ प्रवासीजखमी झाले असून त्यापैकी १० किरकोळ, १०, गंभीर तर सुमारे ५ अत्यंत गंभीर जखमी झाले आहे.जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अत्यंत गंभीर जखमिंना जळगाव येथे रेफर करण्यात आले आहे.
जखमींमध्ये बस चालक दिलीप दयाराम पाटील, हुसेना इमाम कुरेशी 60, नसरीन सय्यद युनूस 55, मेहेक बी आयुब शेख 17, सानिया इमाम कुरेशी 17, सारिका मोरे 40, मेहमूद छबु तडवी 36 आदीचा समावेश आहे.
वैद्यकीय अधिकारी डाॅ. शुभांगी चौधरी, डाॅ. कृष्णा पाटील, डाॅ. कुश भदोरीया, डाॅ. अभिषेक यादव, डाॅ. निखिल कुमार यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले.
या प्रकरणी निंभोरा पोलिसात अपघात दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक अविनाश पाटील करीत आहे.