सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करणार : श्रीराम पाटील

सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करणार : श्रीराम पाटील

May 2, 2024 - 00:27
 0
सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करणार : श्रीराम पाटील

मुक्ताई वार्ता न्यूज

 प्रतिनिधी / फैजपूर 

यावल तालुक्यातील न्हावी येथे माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी.महाजन यांच्या पुतळ्यास महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत प्रचारस सुरुवात केली. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी करीत श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी उपस्थित होते. 

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात न्हावी येथे प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधला. नागरिकांचे प्रश्न यावेळी एकूण घेत सहकारमहर्षी दादासाहेब स्व जे टी महाजन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण भावी काळात समाजकार्य करू असे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील , माजी जि. प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक , काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, न्हावीचे सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच नदीम पिंजारी , विलास चौधरी, भानुदास चोपडे , वामन तायडे, मधुकर झोपे, सरफराज तडवी, वामन तायडे , चेतन झोपे , देवेंद्र चौधरी, चेतन इंगळे, सोनू झोपे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील