मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त रावेर बंजारा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त रावेर बंजारा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त रावेर शहरात बंजारा समाजातर्फे पाराचा गणपती मंदिरापासून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर तालुकातील बंजारा समाजाच्या
दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आले. या प्रसंगी बंजारा समाजाचे दफडा वाद्य मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आश्रमाचे संत श्री दिव्य चैतन्य महाराज होते.
प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,प्रदेश सचिव युवा नेते धनंजय चौधरी, डॉ. केतकी पाटील,गोदावरी फाउंडेशन ,यावलचे माजी सभापती भरत महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, पो नि. डॉ.विशाल जयस्वाल , क्षेत्रपाल अधिकारी अजय बावणे, सारिका चव्हाण- बेटी पढाव बेटी बचाव संयोजक, अर्जुन जाधव मा. सरपंच पाल ,रवींद्र पवार सर स्वामी संस्थापक ,सचिन पाटील कृ.बा. स. सभापती, इत्यादी मान्यवर उपस्थित होते, पाल लोहारा,जुनूने लालमाती कुसुंबा, ऐनपुर,आभोडा तांडा,गुलाबवाडी,के-हाळा,रावेर इ. तांड्यातून विद्यार्थी आणि समाज बांधव उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंजारा समाज विद्यार्थी परिषदेचे दिनेश पवार,साई राठोड,दिलीप राठोड,आर्यन चव्हाण,विकास चव्हाण,तेजस वंजारी,रोहन, दीपक, रोहित,अक्षय कृष्णा,ऋषिकेश,गोविंद,सुदाम,जीवन हर्षल, सुमित इ. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
राष्ट्रीय बंजारा टायगर चे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड ता.अध्यक्ष सुरेश पवार,इंटरनॅशनल स्कूलचे महेंद्र पवार, रमेश राठोड ,राजु पवार सर यांच्या अनमोल सहकार्य लाभले प्रस्ताविक विनय पवार यांनी केले तर विजय पवार सरांनी सूत्रसंचालन केले तर रमेश राठोड सरांनी आभार प्रदर्शन केले.