निंभोरा येथील राजीव बोरसे संगीत जीवन पुरस्काराने सन्मानित

निंभोरा येथील राजीव बोरसे संगीत जीवन पुरस्काराने सन्मानित

Sep 12, 2023 - 23:41
 0

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील रॉयल कला ग्रुपचे संयोजक तसेच कलावंत राजीव तुकाराम बोरसे हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून संगीत क्षेत्रात कार्य करीत असल्याने याबाबत त्यांच्या कार्याची नोंद घेऊन भुसावळ येथील सुनहरे पल आर्केस्ट्रा , सुर साज तरंग आर्केस्ट्रा, स्वर नक्ष आर्केस्ट्रा यांचे संयोजक दीपक नाटेकर ,संजीव सुरवाडे, विकास जंजाळे यांनी भुसावळ येथील एक शाम शहीदो के नाम या सांस्कृतिक कार्यक्रमात आमदार संजय भाऊ सावकारे भुसावळ तसेच मनोज भाऊ बियाणी ,जळगाव जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिअन चे अध्यक्ष मोहन तायडे आदी मान्यवऱ्यांच्या उपस्थितीत बोरसे यांना 2023 चा संगीत जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानपत्र पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. बोरसे हे बऱ्याच वर्षापासून संगीत क्षेत्रात कार्य करीत आहे यामुळे त्यांना आतापर्यंत वेगवेगळ्या प्रतिष्ठान व संस्थांतर्फे चार पुरस्कार मिळाला असून हा पाचवा पुरस्कार त्यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र सत्कार करून अभिनंदन होत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील