भुसावळ , मुक्ताईनगर एस.टी. आगाराला २० इलेक्ट्रिक बसेसची प्रतीक्षा
भुसावळ , मुक्ताईनगर एस.टी. आगाराला २० इलेक्ट्रिक बसेसची प्रतीक्षा

मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
भुसावळ आणि मुक्ताईनगर एस.टी. आगारात असेलेल्या बसेसची संख्या कमी पडत आहे. आता सणासुदीच्या दिवसात प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात त्यातच महिलांना 50% तिकीट मध्ये सवलत
असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला बसणे प्रवास करताना दिसत आहे.यामुळे जाहीर झाल्यानुसार २० इलेक्ट्रिक बसेस लवकर मिळाव्या अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
जळगावनंतर सर्वात जास्त प्रवासी हे भुसावळ येथून बसद्वारे प्रवास करतात. रेल्वे स्थानकामुळे तर परिसरातील शेकडो प्रवासी भुसावळात येत असतात. अर्थातच बाजूलाच बस स्टैंड असल्यामुळे प्रवासी लांब कोठे रेल्वेने जाताना किंवा येताना परिसरातील गावापासून बसनेच प्रवास करतात. यामुळे भुसावळ बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची लगबग असते.
याकरिता भुसावळ आगाराने २० इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या बसेस भुसावळ आणि मुक्ताईनगर आगारात प्रवाशांच्या तुलनेत बस संख्या कमी आहे. २० इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली होती. बसेस लवकर मिळाल्यास प्रवाशांसाठी अधिकच सोयीचे होईल इलेक्ट्रिक बस मिळतील अशी घोषणाही चार महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, सणासुदीचे दिवस आल्यावरसुद्धा इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा कायम आहे.याकरिता नेहमीच भुसावळ बस आगारातून बसेसची मागणी करण्यात येते. दरम्यान, प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन २१८ बसेसच्या रोज २२ फेऱ्या मंडळाने भुसावळ आगाराला २० इलेक्ट्रिक बसेस देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला जवळपास चार महिने होऊन गेले, मात्र अजूनही केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झाले नसल्यामुळे नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे .