पट्टेदार वाघाचा राखणदार विसावला , वनरक्षक बापूसाहेब थोरात यांचे निधन
पट्टेदार वाघाचा राखणदार विसावला , वनरक्षक बापूसाहेब थोरात यांचे निधन
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रात दक्षिण डोलारखेडा हे बापूसाहेब थोरात पट्टेदार वाघाचे भ्रमणक्षेत्र आहे. त्याचे अस्तित्व जपण्यासाठी डोळ्यांत तेल घालून कर्तव्य निभावणारे वनरक्षक बापूसाहेब भिका थोरात यांचे मंगळवारी (ता. ) सकाळी हृदयविकाराने निधन झाले. 'पट्टेदार वाघाचा राखणदार सातपुड्याच्या कुशीत विसावला' अशा शब्दांत इथल्या वनप्रेमींनी शोकसहवेदना व्यक्त केल्या.
मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनविभागातील दक्षिण डोलारखेड्यात पट्टेदार वाघाचे अस्तित्व असून मुक्त संचार आहे, अशा संवेदनशील बिटात गेल्या तीन वर्षापासून बापूसाहेब थोरात हे आपले कर्तव्य पार पाडत आहेत मंगळवारी ते आपल्या कर्तव्यावर असताना सकाळी पाचला अचानक त्यांच्या छातीतदु खायला लागले ते वनमजूर तुकाराम गवळे यांना घेऊन मुक्ताईनगर येथील हॉस्पीटलमध्ये गेले असता त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले व त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे जाण्यास सांगितले लगेच त्यांनी वनमजूर तुकाराम गवळे यांना घेऊन रुग्णवाहिके द्वारा जळगाव येथे गेले असता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली. थोरात हे मुळचे पारोळा तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी असून ९ एप्रिल २०१० ते जळगाव वनविभागात कार्यरत झाले त्यांनी पाचोरा, पाल आणि वढोदा येथे कर्तव्य पार पाडले असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते वढोदा वनपरिक्षेत्रात ड्युटी करीत आहेत
तीन वर्षे ते पुरनाड नाक्यावर होते तर गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून पट्टेदार वाघाचा आदिवास असलेल्या दक्षिण डोलारखेडा बिटात आपले कर्तव्य पार करत होते ते या परिसराशी एकरूप झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.