लोहारा येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी बनवल्या राख्या
लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा लोहारा येथे विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनासाठी राख्या तयार केल्या आहे.
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क
लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा लोहारा येथे विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनासाठी राख्या तयार केल्या आहे.शिक्षकांच्या मदतीने बाजारातून राख्या बनवायचे साहित्य विकत घेऊन मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स MSFC विभागांतर्गत शाळेत राख्या तयार केल्या आहेत.
विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच व्यवहार ज्ञान व विक्री कौशल्याचा अनुभव देण्यासाठी या राख्या लोहारा व खिरोदा येथील बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्य आत्मसात करणे व मार्केटिंगचे ज्ञान मिळवणे हा यामागचा हेतू आहे .
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या 800 राख्या तयार करून 2550 रुपयांच्या राख्या स्वतः विक्री केल्या आहे.
निदेशक श्री विलास भारंबे यांनी पुढाकार घेत सर्व निदेशकांच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेतल्या.
मुख्याध्यापक श्री सुधसकर झोपे सर समन्वयीका श्रीमती लिना नेहेते यांचे मार्गदर्शन लाभले .
सातपुडा विकास मंडळ पाल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री शिरीष दादा चौधरी व सचिव श्री अजितदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.