रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली

रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली असून आज या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Aug 29, 2023 - 21:02
 0
रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली

रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली असून आज या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मुक्ताई शुगर मीलच्या चेअरमन रोहिणी खडसे यांची आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आज पक्षाचे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या माध्यमातून त्यांच्यावर राज्य पातळीवरील मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.

 नियुक्तीबद्दल रोहिणी खडसे यांचे शरद पवार, सुप्रील सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, विद्या चव्हाण, एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, अरूणभाई गुजराथी आदींसह पक्षाचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

आज मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत रोहिणी खडसे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत महिला प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

नाथाभाऊंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतांना रोहिणी खडसे यांनी देखील त्यांच्या सोबत हाती घड्याळ बांधले होते. मध्यंतरी त्यांना पक्षात मोठे पद मिळणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. यातच पक्षात फूट पडून अजितदादा पवार गट स्वतंत्र सत्तेत सहभागी झाल्यामुळे ही चर्चा मागे पडली होती. तथापि, आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात

आली आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील