उटखेडा येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
उटखेडा येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क
रावेर तालुक्यातील उटखेडा येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आज सकाळी उटखेडा येथील योगेश रमेश बारी( वय ३५) याने त्याच्या रहाते घरात छताच्या लाकडी बल्ली ल दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत निलेश बारी यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सतिश सानप करित आहे.