रावेर सह मुक्ताईनगर व मध्य प्रदेशातील बुरानपुर जिल्ह्यात मध्ये वादळाचा तडाखा,
रावेर सह मुक्ताईनगर व मध्य प्रदेशातील बुरानपुर जिल्ह्यात मध्ये वादळाचा तडाखा,
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे त्यात आज भर पडत रावेर तालुक्यातील दोधे,अटवाडा,
तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली, पातोंडी व मध्य प्रदेशातील ब्रहानपूर जिल्ह्यातील जैनाबाद सह परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांचे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्याचा पुन्हा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
आधीच मागील वर्षाच्या पिक विम्याचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नसून ती वेळोवेळी मागणी करूनही शेतकऱ्यांच्या हातावर शासनाने तुरी दिल्याने शेतकरी हवालदील झाला आहे तर आता झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे हाता तोंडाशी आलेला घासही वादळाने हिरावल्याने शेतकरी हतबल झालेला आहे
शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे