पेट्रोल पंपावर वाटर फिल्टर चा शॉक लागल्याने 28 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
पेट्रोल पंपावर वाटर फिल्टर चा शॉक लागल्याने 28 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई वार्ता न्यूजरा वेर : प्रतिनिधी
रावेर शहरातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील श्रीराम पेट्रोलियम येथील पेट्रोल पंपावर स्टिलच्या आरओ फिल्टर मधील पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय युवकाचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रावेर शहरातील रहिवासी मयत धृव चरणसिंग कुशवाह (रा. सुजातपूर, जि. भिंड) ह.म. श्रीकृष्ण नगर रावेर हा युवक अनेक वर्षांपासून श्रीराम पेट्रोलियम समोर गाडी लाऊन पाणीपुरी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. रविवारी, १९ मे रोजी सायंकाळी श्रीराम पेट्रोलियम येथे स्टिलच्या आरओ फिल्टर मशीनवर पाणी पिण्यासाठी गेला होता.
आरो फिल्टर मधून पाणी घेण्यासाठी हात लावताच ध्रुव खाली पडल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनीं सांगितले. लगेच परिसरातील नागरिकांची गर्दी जमा झाली. त्यानंतर ध्रुव कुशवाह याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र काटकर यांनी ध्रुव याला तपासल्यावर त्याला मृत घोषित केले. मयत ध्रुव याची घरची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, गर्भवती पत्नी असा परिवार आहे.