रोटाव्हेटर मध्ये अडकल्याने शरीराचे तुकडे होऊन ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू
रोटाव्हेटर मध्ये अडकल्याने शरीराचे तुकडे होऊन ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू
*मुक्ताई वार्ता न्युज नेटवर्क,यावल*।
यावल तालुक्यात शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने मशागतीचे काम करत असताना रोटाव्हेटर मध्ये अडकून ट्रॅक्टर चालकाच्या शरीराचे तुकडे होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावातील विजय जानकीराम (बाविस्कर) कोळी,वय, ३५ वर्ष. ही व्यक्ती ट्रॅक्टरच्या साह्याने शेतात रोटाव्हेटर ने मशागत करत असताना ट्रॅक्टर चालक विजय कोळी यांचा मागील बाजूला तोल गेल्यामुळे ते रोटावेटर मध्ये पडल्याने विजय कोळी हे रोटरमध्ये अडकल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. घटनेत त्यांचा दुर्दैवी असा भयानक मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे