चिनावल येथील शेतकऱ्याचा रोटाव्टहेर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू,परिसरात हळहळ व्यक्त
चिनावल येथील शेतकऱ्याचा रोटाव्टहेर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू,परिसरात हळहळ व्यक्त
चिनावल ता. रावेर (मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क ) :
शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडणी करीत असतांना ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने चिनावल तालुका रावेर येथील यशवंत हेमचंद्र धांडे वय ५७, या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार 12 मे रोजी घडल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
रावेर तालुक्यातील चिनावल येथील शेतकरी यशवंत धांडे हे शेतात अंतर मशागतीसाठी ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडत असताना ट्रॅक्टर यशवंत धांडे यांच्या अंगावरुन गेल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
ही घटना आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ यशवंत धांडे यांना गावातील रुग्णालयात उपचारासाठी नेले,परंतु याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे चिनावल व परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.