रावेर मधील अविवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

रावेर मधील अविवाहित तरुणाची राहत्या घरी आत्महत्या

Oct 27, 2023 - 17:35
Oct 27, 2023 - 18:31
 0
रावेर मधील अविवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

रावेर येथील रहिवासी किशोर बाबुलाल जैन वय 42 यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे. त्याने तणावातून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांमधून बोलले जात आहे. यावेळी नातेवाईकांनी रावेर ग्रामीण रूग्णालयात एकच अक्रोश केल्याचे पहायला मिळाले. किशोर जैन रा. रथगल्ली रावेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

किशोर जैन हा तरूण आपल्या परिवारासह राहत होता. राहत्या घरात कुणीही नसतांना त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तो कोणत्यातरी तणावात होता.याबाबत रावेर पोलीस स्टेशनला कैलास दत्तात्रय सैतवाल यांनी दिलेल्या खबरीवरून पुढील नोंदणीचे काम सुरू होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील