शिक्षण वाचवा लोक अभियान रावेर तालुका
शिक्षण वाचवा लोक अभियान रावेर तालुका
शिक्षण वाचवा लोक अभियान रावेर तालुका
राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या विरोधात रावेर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटनां तालुका मुख्याध्यापक संघ तालुका माध्यामिक संघ ज्युनिअर कॉलेज संघटना तालुका शिक्षकेतर संघ संस्थाचालक संघटना तालुका प्राथमिक संघटना यांच्यावतीने रावेर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले माननीय तहसीलदार बंडू कापसे यांना 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा भंद करणे बाबत धोरण रद्द करा , शाळांचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा , विविध विभागातील कंत्राटी करणाचा निर्णय रद्द करा , जुनी पेन्शन योजना लागू करा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जे के पाटील रावेर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष ललीत चौधरी सचिव व्ही जे चौधरी मुख्याध्यापक संघाचे विद्या सचिव एन व्ही पाटील जळगाव जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष व संस्था चालक संघटनेचे सदस्य शैलेश राणे रावेर तालुका ज्युनिअर कॉलेज तालुकाध्यक्ष अरुण राठोड कोषाध्यक्ष राजेंद्र उपाध्ये माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष नितीन महाजन सचिव नरेंद्र दोडके शिवाजी येवले प्रदीप पाटील, शिक्षकेतर संघटना उपाध्यक्ष तुषार पाचपांडे किरण सुरळकर प्राथमिक शिक्षक संघटनेचे कैलास घोलाणे बहुसंख्येने संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते