रावेर तालुक्यातील गौरखेडा शिवारात आढळला चिंचाटी येथील युवकाचा मृतदेह

रावेर तालुक्यातील गौरखेडा शिवारात आढळला चिंचाटी येथील युवकाचा मृतदेह

Feb 1, 2024 - 13:31
 0
रावेर तालुक्यातील गौरखेडा शिवारात आढळला चिंचाटी येथील युवकाचा मृतदेह

रावेर तालुक्यातील सावखेडा येथून जवळचअसलेल्या चिचाटी - गौरखेडा शिवारात सुकी नदीपात्रात चिंचाटी येथील रसूल रशीद तडवी (वय ३७) या तरुणाचा मृतदेह २८ रोजी आढळून आल्याने  खळबळ उडाली आहे

याबाबत मयताचे वडील रशीद तुकडू तडवी यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारताच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .मयताचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत. मयत रसूल रशीद तडवी हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत रसूल तडवी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील