खिरवड विकास माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय स्पर्धेत अभूतपूर्व यश
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l खिरवड विकास माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
विकास माध्यमिक विद्यालय ,खिरवड येथील इयत्ता ७ वी तील विद्यार्थीनी मयुरी अविनाश पाटील हिने राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन चित्रकला स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवून आपल्या शाळेचे आणि कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ही स्पर्धा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे संपन्न झाली.
महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांमध्ये मयुरीने आपल्या कलागुणांद्वारे स्वत:ची ओळख निर्माण केली. तिच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक यांचे प्रभावी मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य तसेच तिचे वडील अविनाश पाटील यांचे अखंड प्रोत्साहन राहिले.
शाळेच्या संस्थेचे चेअरमन जिजाबराव चौधरी, सचिव जे.के. पाटील सर,मुख्याध्यापिका सौ.डि.ए.पाटील मॅडम , शिक्षकवृंद व खिरवड गावातील ग्रामस्थांच्या वतीने मयुरीचे मन:पूर्वक कौतुक करण्यात येत आहे. तिचे यश संपूर्ण शाळेसाठी प्रेरणादायी ठरेल आणि इतर विद्यार्थ्यांमध्येही कलेची आवड निर्माण करण्यास प्रवृत्त करेल.