मतदार जनजागृतीसाठी पंचायत समिती व नगरपालिका कडून मॅरेथॉन व रॅली
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l मतदार जनजागृतीसाठी पंचायत समिती व नगरपालिका कडून मॅरेथॉन व रॅली चे अजून करण्यात आले होते यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघात मतदारांची जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम शासनाकडून राबविण्यात येत असून यात रावेर पंचायत समिती व रावेर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रावेर पंचायत समिती येथून निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी खेचंद वानखेडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली या मॅरेथॉन वर आलेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सरदारजी ची हायस्कूलचे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती वर वारकऱ्यांच्या वेशभूषेत गीत सादर केले.
राहुल पाटील यांनी रांगोळ्या काढत मतदार जनजागृती केले निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे व तहसीलदार बंडू कापसे यांनी या रांगोळी च्या माध्यमातून केलेले जनजागृती याबद्दल राहुल पाटील यांचे कौतुक केले
सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र फेगडे, पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल, गटशिक्षणाधिकारी विलास कोळी, विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे, मुख्याधिकारी समीर शेख, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशन अध्यक्ष दीपक नगरे, आय एम ए संघटनेचे सचिव डॉ मिलिंद कुमार वानखेडे, सरदार जीजी हायस्कूलचे उपप्राचार्य शैलेश राणे, क्रीडा शिक्षक प्रा जे के पाटील, प्रा एन व्ही वाणी, प्रा एन जी पाटील, प्रा पी एन पाटील, प्रा व्ही व्ही पाटील, प्रा डी बी महाजन, केंद्रप्रमुख दिलीप पाटील, नगरापरिषद कर्मचारी कुणाल पाटील, पाणीपुरवठा अभियंता नितेश चांगरे आरोग्य निरीक्षक युवराज गोयर, वैभव नेहेते, दीपक सुरवाडे, गणेश रणशिंगे व स्वच्छता कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदर रॅलीमध्ये लकी योगेश महाजन केतन उमेश महाजन भूषण राजेंद्र कपले देवेश प्रवीण पाटील या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती वर पारंपारिक वेशभूषेत स्वाद्य गीत सादर करून जनजागृती केली.
डॉ आंबेडकर चौक सदर रॅलीचा समारोप प्रसंगी पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या उपस्थितीत मतदार म्हणून सर्वांची सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली