विशाल अग्रवाल यांचा वाढदिवस गोपूजनाने उत्साहात साजरा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l न्यू अग्रवाल एजन्सी चे संचालक विशाल अग्रवाल यांचा वाढदिवस गोपूजनाने उत्साहात साजरा करण्यात आला

Jun 26, 2025 - 18:55
 0

 मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

रावेर शहरातील न्यू अग्रवाल एजन्सी चे संचालक विशाल अग्रवाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण गौसेवा समिती रावेर येथे गौमातेचे पूजन करुण साजरा करण्यात आला याप्रसंगी श्रीकृष्ण गौसेवा समितीचे मार्गदर्शक ह भ प ऋषिकेश महाराज कपिल महाराज दुबे सचिव चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष अमोल पाटील भूषण कासार भास्कर भारी भूषण अग्रवाल अनिल पाटील मुकेश बारी राजू शिंदे मामाश अग्रवाल हर्ष केडिया व कृष्ण ओतारी यांनी विशाल भाऊ व नव्याने पीपल बँकेचे चेअरमनपदी नियुक्त झालेले दिलीप पाटील व राजेश शिंदे तसेच सरदारजी हायस्कूलमध्ये सचिव पदी निवडून आलेल्या अक्षय अग्रवाल यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी कपिल महाराज दुबे यांनी विशाल अग्रवाल यांच्या सामाजिक व धार्मिक अध्यात्मिक कार्याची जाणीव सर्वांना करून दिली सचिव चंद्रकांत चौधरी यांनी गोशाळेचे आर्थिक नियोजन करण्याची विशाल अग्रवाल यांचे कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली अक्षय अग्रवाल यांनी विशाल भाऊ हे व्यापारी वृत्तीचे नसून यांच्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची व दुसऱ्यांना मदत करण्याचे वृत्ती आहे असे सांगितले ऋषिकेश महाराज यांनी विशाल भाऊंच्या पारिवारिक जीवनात घरातील वातावरण त्याच्या आईमुळे आध्यात्मिक धार्मिक आहे व हेच संस्कार भाऊ जपत आहे ऐसे उद्बोधन केले उपस्तित सरवन शुभेच्या दिल्या

आपल्या आभार पर भाषणामध्ये विशाल अग्रवाल यांनी आपली ही गोशाळा जीर्ण झालेली आहे. या गो शाळेला  नूतनीकरणाची अत्यावश्यक गरज आहे ही गोशाळा एक चांगल्या मोठ्या स्वरूपात व्हावी या ठिकाणी जास्तीत जास्त गोमातेंचे संगोपन व आश्रयाची व्यवस्था व्हावी असा मानस व्यक्त केला व यासाठी सर्व प्रकार मि पर्यंतशील राहिल व या कार्यासाठी आपले गौसेवक आमदार अमोल भाऊ जावळे यांनी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे वचन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या फोन द्वारे दिलेले आहे याची माहिती उपस्थित सर्व सदस्यांना दिली

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील