कमलाबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा, विद्यार्थिनी बनल्या वैज्ञानिक
कमलाबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा, विद्यार्थिनी बनल्या वैज्ञानिक
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
रावेर :--सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान मंडळाने मुख्याध्यापिका सौ जे एस कुलकर्णी-पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ शिक्षिका सौ पी जे कुलकर्णी व व्यासपीठावर उपमुख्याध्यापक आर आर पाटील जेष्ठ विज्ञान शिक्षिका एम पी पासपोहे एस एल निंभोरकर एम एम पवार एनडी खारे एस एस महाजन एन टी वैद्य हे शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रयोगशाळेतील साहित्य वापरून व पुस्तकातील प्रयोगांचे निरीक्षण करून स्वतः ते प्रयोग सादर केले यामध्ये विविध प्रकारचे वैज्ञानिक तत्व असलेले प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले यासाठी विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षक टी एस गडे आर के शिंदे प्रयोगशाळा सहाय्यक मोहन महाजन यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींना प्रयोगशाळा खुली करून दिली यामुळे विद्यार्थिनींना नवनवीन प्रयोग आत्मसात करण्याच्या दृष्टीन प्रेरणा मिळाली प्रमुख वक्ते सौ एम पी पाचपोहे यांनी डॉ.सी व्ही रामण व रामण इफेक्ट्स बद्दल माहिती सांगितली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा पी जे कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींनी विज्ञाननिष्ठता जोपासावी व भविष्यात देशाच्या विकासात भर घालावी असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तेजस्विनी महाजन दीपिका पाटील श्रद्धा पाटील निधी मानकर या विद्यार्थ्यांनीनी केले कार्यक्रमासाठी बहुसंख्य संख्येने विद्यार्थी उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी सर्व विज्ञान शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले