कार व मोटरसायकलच्या अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर दोन जखमी

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर वाघोदा दरम्यान असलेल्या सुखी नदी पुलावर कार व मोटरसायकलचा अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली

Apr 15, 2025 - 17:27
 0
कार व मोटरसायकलच्या अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी  मृत्यू तर दोन जखमी

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l

 रावेर वाघोदा दरम्यान बऱ्हाणपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (ता. रावेर) नजीक सुकी नदी पुलावर मोटरसायकल व ब्रिझा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची बातमी समजताच वडगाव गावावर शोककळा पसरली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव येथील जावेद तडवी, वसीम करीम (वय ३०) व बबलू अशरफ (वय २७) हे तिघे सुझुकी मोटरसायकल (MH 48 BX 7926) वरून सावदा येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून परत येत असताना सुकी नदी पुलाजवळ रावेरहून सावदाकडे जाणाऱ्या ब्रिझा कार (MH19 CY 1007) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

 या अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असून वसीम करीम व बबलू अशरफ हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव हलविण्यात आले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील