तापी नदीकाठच्या धुरखेडा गावातील तीन बकऱ्यांना बिबट्याने केले ठार
रावेर तालुक्यातील तापी नदीकाठावरील धुरखेडा येथे गेल्या चार पाच दिवसांपासून बिबट्याने मुक्त संचार करीत हैदोस घातला असून त्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या आहेत.
*मुक्ताई वार्ता*
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील तापी नदीकाठावरील धुरखेडा येथे गेल्या चार पाच दिवसांपासून बिबट्याने मुक्त संचार करीत हैदोस घातला असून त्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या आहेत.
तापी नदी काठी असलेल्या धुरखेडा येथील दोन नागरिक यांच्या तीन बकऱ्या बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली आहे. यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट देवून पाहणी केली. पिंप्रीनांदू व धुरखेडा येथील काही मजुरांना संध्याकाळी या गावाच्या शेती शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा मजूर वर्गात असुन शेती शिवारासह गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याच्याही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे