के-हाळा येथील पंधरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या,आत्महत्याच कारण अस्पष्ट

के-हाळा येथील पंधरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या,आत्महत्याच कारण अस्पष्ट , रावेर परिसरात अकस्मात मृत्यूची नोंदरावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील नंदिनी दीपक महाजन (वय १५, रा. केऱ्हाळे बु. ता. रावेर) या नववीच्या विद्यार्थिनीने कुठल्यातरी नैराश्यात येऊन शनिवारी रात्री ८ वाजेच्या पूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली असून तिच्या आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे गावात मात्र व्यक्त होत आहे नंदनी महाजन के-हाळा येथे तिची आईची आई म्हणजे आपल्या आजीसोबत राहत होती.तिचा मामा एक वर्षांपूर्वी वारला आहे. तर आई लहानपणापासूनच विभक्त झाली असून वडील दीपक यांचे निधन झालेले आहे. नंदनी महाजन हीज् केऱ्हाळे येथील दत्तू सोनजी माध्यमिक विद्यालयात नववीत शिकत होती. तिची आजी निर्मलाबाई भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करून दोघांचे पोट भरत होती. शनिवारी आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला दरवाजे बंद आढळले. त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात नंदिनी हिने गळफास घेतल्याचे दिसले. तेव्हा तिने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी नंदिनीला रुग्णालयात दाखल केले. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहे. दरम्यान, नंदिनी हुशार होती. मनमिळावू, गोंडस मुलगी होती. मात्र तिने अचानक आत्महत्या करण्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Oct 9, 2023 - 03:00
 0
के-हाळा येथील पंधरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या,आत्महत्याच कारण अस्पष्ट

मुक्ताई वार्ता रावेर 

 न्यूज नेटवर्क करावे

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील नंदिनी दीपक महाजन (वय १५, रा. केऱ्हाळे बु. ता. रावेर) या नववीच्या विद्यार्थिनीने कुठल्यातरी नैराश्यात येऊन शनिवारी रात्री ८ वाजेच्या पूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली असून तिच्या आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे

नंदनी महाजन के-हाळा येथे तिची आईची आई म्हणजे आपल्या आजीसोबत राहत होती.तिचा मामा एक वर्षांपूर्वी वारला आहे. तर आई लहानपणापासूनच विभक्त झाली असून वडील दीपक यांचे निधन झालेले आहे. 

नंदनी महाजन ही केऱ्हाळे येथील दत्तू सोनजी माध्यमिक विद्यालयात नववीत शिकत होती. तिची आजी निर्मलाबाई भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करून दोघांचे पोट भरत होती. शनिवारी आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला दरवाजे बंद आढळले.त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात नंदिनी हिने गळफास घेतल्याचे दिसले. तेव्हा तिने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी नंदिनीला रुग्णालयात दाखल केले. 

रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहे. दरम्यान, नंदिनी हुशार होती. मनमिळावू, गोंडस मुलगी होती. मात्र तिने अचानक आत्महत्या करण्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील