रावेर येथिल लोकन्यायालयात 159 खटले तडजोडीने निकाली, 44 लाख रुपयांची वसुली

न्यायालयात तालुका विधी सेवा समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात दिवाणी , फौजदारी व तडजोड पूर्व खटले असे मिळून एकूण 159 खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले

Sep 10, 2023 - 00:42
 0
रावेर येथिल लोकन्यायालयात 159 खटले तडजोडीने निकाली, 44  लाख रुपयांची वसुली

मुक्ताई वार्ता , रावेर 

न्युज नेटवर्क 

रावेर येथिल दिवाणी फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात दिवाणी , फौजदारी व तडजोड पूर्व खटले असे मिळून एकूण 159 खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले तर स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक,बँक ऑफ महाराष्ट्र, महाबँक, बीएसएनएल व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या थकलेल्या रकमांबाबत खटला दाखल पूर्वी तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या खटल्यांमध्ये रुपये 36,64,947 रुपयांची वसुली झाली तर फौजदारी व दिवाणी खटल्यांमध्ये 6,96,700 रुपयांची वसुली झाली अशी एकूण 43,61,647 रुपयांची वसुली झाली .

 लोकन्यायालयाच्या अध्यक्षस्थानी रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. प्रविण पी. यादव होते तर रावेर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शितल जोशी, उपाध्यक्ष ऍड. बी. डी. निळे, सचिव ऍड. दिपक एच. गाढे, सहसचिव ऍड. किशोर पाटील, सरकारी वकील डुट्टे,ऍड. प्रविण पासपोहे,ऍड. विपीन गडे,ऍड. योगेश गजरे, ऍड. सुभाष धुंदले, ऍड.डी. ई. पाटील, ऍड. तुषार चौधरी,ऍड. दिपक पी. गाढे, ऍड. सलीम जमलकर, ऍड.मिलिंद पाटील, ऍड. आर. ए. पाटील, ऍड. डी. डी. ठाकूर,ऍड. जगदीश महाजन, ऍड. रमाकांत महाजन,ऍड. अमोल कोंघे, ऍड. उदय सोनार, ऍड. के. बी. खान, ऍड. तुषार महाजन, ऍड. मुजाहीद शेख, ऍड. सैय्यद, ऍड. मोहन कोचूरे, ऍड. शिवदास कोचूरे, ऍड. आनंद वाघोदे, ऍड. निलेश महाजन आदी वकील उपस्थित राहून लोकन्यायालय यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. पंच न्यायाधीश म्हणून ऍड. दिपक तायडे यांनी काम पाहिले. यावेळी सहाय्यक अधीक्षक एल. आर. पाटील , डी. जी.इंगळे भाऊसाहेब, बी. के. तडवी, विश्वनाथ चौधरी, डी. एस. डिवरे, निखिल पाटील, एस. एस. पठाण, राहुल सोनवणे, भरत बारी, सिद्धार्थ जाधव,भूषण महाजन,चेतन पवार, किरण पाटील, भगवान चौधरी आदी न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील