विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन चा ४६ वा वर्धापनदिन सोहळा साजरा

महाराष्ट्रातिल विज क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार १०२९ संघटनेचे दि ४ सप्टेंबर 2023 सोमवार रोजी ४६ वे वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने जळगांव विभागा सह जिल्ह्यातील सावदा,चाळीसगाव , पाचोरा, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, विभागीय व उपविभागीय स्तरावर साजरा करण्यात आले .

Sep 4, 2023 - 23:41
 0

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर 

महाराष्ट्रातिल विज क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार १०२९ संघटनेचे दि ४ सप्टेंबर 2023 सोमवार रोजी ४६ वे वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने जळगांव विभागा सह जिल्ह्यातील सावदा,चाळीसगाव , पाचोरा, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, विभागीय व उपविभागीय स्तरावर साजरा करण्यात आले . सर्वप्रथम संघटनेचे ध्वजारोहण जळगाव पतसंस्था कार्यालयात सकाळी जळगाव माजी झोनसचिव श्री शरदजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर ठिकठिकाणी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी च्या आदेशानुसार वार्ताफलकाचे पूजन करण्यात आले.महिला प्रतिनिधि तर्फे हळदी कुंकु चे कार्यक्रम होऊन झोन, सर्कल तसेच प्रत्येक विभागीय स्थरावर "झाडे लावा झाड़े जगवा" या संकल्पनेतून वृक्षारोपण व रक्तदान करण्यात आले.

या वर्धापन दिनानिमित्त संघटनेचे झोन, सर्कल , विभाग तसेच उपविभागीय पदाधिकारी सह असंख्य सभासद आवर्जून उपस्थित होते. अशी माहिती संघटनेचे जळगाव प्रसिद्धि प्रमुख छोटूलाल चव्हाण यांनी दिली.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील